Home क्राइम माशाचे कालवण करण्यास नकार देणाऱ्या पत्नीचा पतीने केला खून

माशाचे कालवण करण्यास नकार देणाऱ्या पत्नीचा पतीने केला खून

566
0

नगर : माशाचे कालवण करण्यास नकार देणाऱ्या पत्नीचा तिच्या पतीने खून केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढ परिसरात घडली आहे. गंगाबाई बद्री चव्हाण (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. २ नोव्हेंबरला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी काल, मंगळवारी उशिरा राहुरी पोलीस ठाण्यात बद्री चव्हाण (रा. कुक्कडवेढ, ता.राहुरी) याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी बद्री चव्हाण याने २ नोव्हेंबरला त्याची पत्नी गंगाबाई हिला माशाचे कालवण करण्यास सांगितले. मात्र, सोमवार असल्यामुळे गंगाबाई यांनी माशाचे कालवण करणार नसल्याचे सांगितले. भाजी करण्यास नकार देताच बद्री चव्हाण याने गंगाबाई यांना कुक्कडवेढ येथील कॅनोलच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या डबक्याजवळ नेले. तेथे गंगाबाई यांना मारहाण केली. त्यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात गंगाबाई यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

दरम्यान, या प्रकरणी मृत महिलेचा मुलगा पृथ्वीराज याने पोलिसांत तक्रार दिली असून, त्यावरून राहुरी पोलीस ठाण्यात बद्री चव्हाण याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here