Home नागपूर आज आकाशात पुन्हा दिसेल गुरू-शुक्राचा विलोभनीय योग

आज आकाशात पुन्हा दिसेल गुरू-शुक्राचा विलोभनीय योग

257
0

नागपूर:आज १ मार्च २०२३ रोजी सूर्यास्ता नंतर पश्चिम आकाशात अतिशय विलोभनीय आणि दुर्मिळ अशी गुरू आणि शुक्र ग्रहांची युती पहावयास मिळणार आहे. ही अशी युती १५ वर्षानंतर दिसत असून पुन्हा पाहण्यासाठी १५ वर्षाची वाट पहावी लागणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे ह्यानी दिली आहे.सध्या गुरू आणि शुक्र हे मिन राशीत असून ते गेल्या आठवड्यापासून जवळ येत होते. १ ते ५ मार्चपर्यंत ही युती जवळ राहणार असली तरी सर्वाधिक जवळ १ मार्चला राहणार आहे. आकाशात सर्वाधिक तेजस्वी असे दोन ग्रह एक डिग्री पेक्षा कमी अंतरावर येण्याची आणि पाहण्यासाठी ही दुर्मिळ संधी आहे.हे दोन ग्रह जवळ दिसत असले तरी पृथ्वी पासून त्यांचे अंतर खूप जास्त आहे.आज शुक्र पृथ्वीपासून २०,५६,३१,१४१ कोटी किमी तर गुरू ८६,१८,४३,१९२ कोटी किमी अंतरावर असतील. १ मार्चला दोघांतील अंतर एक डिग्रीच्या कमी म्हणजे ३९ आर्कमीटर अंतरावर असेल तर २ मार्चला ४५ आर्कमीटर अंतरावर असेल. ह्या दरम्यान शुक्राची तेजस्विता -४.२ तर गुरुची तेजस्विता -२ ० असेल. ३,४,५ मार्च पर्यंतसुद्धा ते १ ते २ डिग्री इतक्याकमी अंतरावर असतील. पुढे गुरू ग्रह सूर्याकडे गेलेला तर शुक्र आकाशात वर येताना दिसेल.महाराष्ट्रातील सर्व खगोलप्रेमी विध्यार्थी आणि नागरिकांनी हा दुर्मिळ योग पाहण्याची संधी सोडू नये.चंद्रपुर येथे उद्या १ मार्च रोजी डॉ. पंजाबराव देशमुख शाळा, वडगाव, आंबेडकर सभागृहा जवळ, चंद्रपुर येथे संध्याकाळी सूर्यास्ता नंतर लगेच सहा ते आठ वाजे दरम्यान गुरू, शुक्र युती अवकाश निरीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व खगोल प्रेमीनी ह्याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्काय वॉचने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here