Home नागपूर भाषण न करताही नागपूरमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी अजित पवारच

भाषण न करताही नागपूरमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी अजित पवारच

337
0

नागपूर : काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीची सभा रविवारी पार पडली. या सभेत अजित पवार यांचे भाषण झाले नसले तरी दिवसभर राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी तेच होते. पवार यांनीही कधी सूचक प्रतिक्रिया देत तर कधी त्यांच्यावर माध्यमांचे अधिक प्रेम असल्याचे सांगत चर्चेला पूरक अशीच वातावरण निर्मिती केली.

अजित पवार भाजपामध्ये जाणार या चर्चेने सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. त्यामुळे नागपूरमध्ये रविवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेच्या निमित्ताने या चर्चेला अधिक उधाण आले. पवार अमित शहा यांना भेटले. ते भाजपामध्ये जाणार, ते सभेला येणार किंवा नाही, आले तरी भाषण करणार किंवा नाही, अशा स्वरुपाच्या चर्चा रविवारी सकाळपासूनच सुरू झाल्या होत्या. मात्र, सकाळी १०.३० लाच पवार यांचे नागपूरमध्ये आगमन झाले. त्यामुळे ते सभेला येणार किंवा नाही या चर्चेला पहिल्या सत्रातच विराम मिळाला. त्यांनीच ते सभेत भाषण करणार नाही हे स्पष्ट केले व त्यामागचे कारणही माध्यमांना सांगितले. मात्र, तरीही त्यांच्या विषयीच्या चर्चा काही थांबेना.

सभेपेक्षा पवारच माध्यमांच्या केंद्रस्थानी होते. ते भाजपामध्ये जाणार का? या मुद्यावर महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया घेऊन माध्यमांनी हा विषय अधिक लावून धरला. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दाणवे यांनी पवार काहीही म्हणत असले तरी सरकार कोसळणार असे सांगत होते. त्यामुळे या मुद्यांवर अजित पवार पुन्हा चर्चेत आले. अमित शहा यांच्याशी भेट झाल्याचेही त्यांनी नाकारले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here