Home जागतिक महामारी उपराजधानीत करोनाच्या नव्या लाटेतील पहिला बळी

उपराजधानीत करोनाच्या नव्या लाटेतील पहिला बळी

263
0

नागपूर : उपराजधानीत करोना वाढत असून शुक्रवारी या आजाराचे आणखी ८४ रुग्ण आढळले. त्यात प्रादेशिक मनोरुग्णालयातील सात रुग्णांचा समावेश आहे. एम्सला दाखल एका रुग्णाचाही या आजाराने मृत्यू झाला असून नव्या लाटेतील हा पहिला मृत्यू आहे.

एम्समध्ये दगावलेला ६५ वर्षीय रुग्ण हा मूळ मध्य प्रदेशातील आहे. त्याला कॅन्सरही होता. करोनाची लक्षणे असल्याने त्याला एम्सला दाखल केले होते. २४ तासांत शहरात ५६, ग्रामीणला २८ अशा एकूण ८४ रुग्णांची भर पडली. त्यात प्रादेशिक मनोरुग्णालयातील २ महिला, ३ पुरुषांचा समावेश आहे. शहरात २४ तासांत २, ग्रामीणला १ असे ३ रुग्ण करोनामुक्त झाले. शहरात सक्रिय रुग्णसंख्या २०८, ग्रामीण ६५, जिल्ह्याबाहेरील १ अशी एकूण २७४ नोंदवली गेली.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या निरीक्षणानुसार, शहरातील एकूण सक्रिय रुग्णांमध्ये शून्य ते २० वयोगटातील ८ टक्के, २१ ते ४० वयोगटातील ४१ टक्के, ४१ ते ६० वयोगटातील २८ टक्के, ६१ हून अधिक वयोगटातील २३ टक्के रुग्णांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here