Home महाराष्ट्र देवदर्शनाला गेलेल्या मित्रांवर काळाची झडप

देवदर्शनाला गेलेल्या मित्रांवर काळाची झडप

60
0

गणपती पुळेला दर्शनासाठी गेलेल्या तिघांचा अपघातात मृत्यू

रत्नागिरी : वर्धा येथील राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी रात्री कारचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होती की कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.कारमधील प्रवासी रत्नागिरीला गणपती पुळे येथे देवदर्शनासाठी जात होते. आणि त्याचा अगोदरच त्यांच्यावर काळाने झडप घातली.

मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावर असणाऱ्या रेल्वे पुलाजवळ रात्री साडे अकरा वाजता हा अपघात घडला. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातल्या हिवरा गावचे हे तरुण गणपती पुळे येथे निघाले होते. रात्री पुलाजवळ येत असताना त्यांची बोलेरो गाडी तिथेच उभ्या ट्रकवर आदळली. अपघातात वाहनचालक शैलेश पंढरी गिरसावले (२६), आदर्श हरिभाऊ कोल्हे (१७), सूरज जनार्दन पाल (२१) यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर यश कोल्हे, भूषण खोंड, शुभम पाल, प्रणय कोल्हे, समीर कोल्हे, मोहन मुंढे यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सेवाग्रामच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here