Home मनोरंजन रिया चक्रवर्तीचा बॉलिवूड ‘कमबॅक’…!

रिया चक्रवर्तीचा बॉलिवूड ‘कमबॅक’…!

229
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात समोर आलेल्या ड्रग्ज केसमध्ये अटक झालेली सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती २०२१ च्या सुरुवातीला बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्तीचा जवळचा मित्र रुमी जाफरी याने एका मुलाखतीत ही माहिती दिली.मुलाखती दरम्यान दिग्दर्शक आणि लेखक रुमी जाफरी यांनी सांगितले आहे की प्रत्येकाला हे वर्ष वाईट गेलेय,रियालाही या वर्षात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे.”एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीला एक महिना तुरुंगात काढावा लागला. या गोष्टीचा तिच्या आयुष्यावर परिणाम झाला आहे’.

“पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला रिया बॉलिवूडमध्ये कमबॅक करेल. ती ज्या परिस्थीतीतून गेलीय त्यानंतर तिच्यावर आपण आरोप करु शकत नाही.”असेही यावेळी रुमी म्हणाला.दरम्यान,सुशांतचा १४ जून २०२० रोजी त्याच्या वांद्रेतील घरात मृतावस्थेत सापडला होता.सीबीआयने रिया चक्रवर्तीला सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी उघडकीस आलेल्या ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी रियाचा जामीन मंजूर केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here