Home कृषी नवा घोटाळा? जिल्ह्यात 331 टक्के वाढलं फळबाग क्षेत्र!

नवा घोटाळा? जिल्ह्यात 331 टक्के वाढलं फळबाग क्षेत्र!

192
0

जालना : राज्यात सर्वाधिक मोसंबी जालना जिल्ह्यात घेतली जाते. तसेच द्राक्ष, डाळिंब आणि इतर फळबाग क्षेत्र देखील मोठे आहे. फळबागांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावी म्हणून शासन स्तरावरून फळपीक विमा भरण्याची आणि नुकसान झाल्यास विमा क्लेम करण्याची सुविधा देखील आहे. मात्र, या योजनेचा फज्जा उडल्याचे चित्र जालना जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 331 टक्क्यांनी फळपीक विमा संरक्षित क्षेत्रात वाढ झाली आहे.

फळबागा नसतानाही विमा भरणाऱ्यांची जिल्हा विभागामार्फत तपासणी सुरू आहे. अद्याप ही तपासणी पूर्ण झाली नसून, किती बोगस प्रकरणे आढळून आली याची माहिती मिळू शकली नाही. परंतु कागदावरच्या फळबागांचा विमा काढणारे अनेकजण यात गुंतणार याची शक्यता आहे. जिल्ह्यात अंबिया बहार 2021 मध्ये विमा संरक्षित क्षेत्र 11 हजार 428 हेक्टर होते. परंतु अंबिया बहार 2022 मध्ये पीक विमा संरक्षित क्षेत्र 37 हजार 884 हेक्टरवर गेले आहे. अचानक अंबिया बहाराचे क्षेत्र तब्बल 331 टक्क्यांनी वाढल्याने शासनासह कंपनीला आश्चर्याचा धक्का बसला आहे. शेतकऱ्यांना अंधारात ठेवून बनावट कागदपत्रांद्वारे विमा क्षेत्र संरक्षित केल्याचा संशय असून, पीक विमा भरलेल्या क्षेत्राची तपासणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here