Home मनोरंजन धोनीच्या मुलीमुळे बिग – बी वादाच्या भोवऱ्यात?

धोनीच्या मुलीमुळे बिग – बी वादाच्या भोवऱ्यात?

242
0

धोनीची मुलगी महिला क्रिकेट संघाची कर्णधार ,ट्विटमुळे अमिताभ बच्चन आले वादाच्या भोवऱ्यात

सोशल मीडियावर बिग-बी यांना ट्रोल केले जात आहे.

मुंबई :भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला कन्यारत्न लाभले. सध्या वीरुष्कावर शुभेंचंच वर्षाव केला जात आहे. यात महानायक अमिताभ बच्चन यांनी हटके पोस्ट आपल्या सोशल मीडियावर टाकली. पण आता हेच त्यांना चांगलेच महागात पडल्याचे दिसून येत आहे. त्यांनी भारतीय क्रिकेटपटूंच्या मुलींची एक यादी ट्विट केली आहे. मात्र ही यादी पाहून काही नेटकरी संतापले अन् त्यांनी घराणेशाहीचे आरोप करत बिग बींना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

त्यांनी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या मुलींची एक यादी ट्विट केली. ही आहे महिलांची टीम असं म्हणत त्यांनी महेंद्र सिंह धोनीच्या मुलीला त्या टीमचा कर्णधार म्हणून घोषीत केलं. मात्र गंमत म्हणून केलेलं हे ट्विट पाहून काही नेटकरी संतापले आहेत. “अमिताभ तुम्ही इथे देखील घराणेशाही चालवणार का?, क्रिकेटला तरी घराणेशाहीपासून दूर ठेवा.” अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत त्यांना ट्रोल केलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here