Home क्राइम शिक्षकाने प्रात्यक्षिकमध्ये कमी गुण देण्याची धमकी देत या विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केला

शिक्षकाने प्रात्यक्षिकमध्ये कमी गुण देण्याची धमकी देत या विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केला

619
0

बुलढाणा तालुक्यातील कोलवड शिवार परिसरातील राजीव गांधी मिलिटरी स्कूलमधील दोन विद्यार्थींनीवर शिक्षकाने अनैसर्गिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित नराधम शिक्षकाविरुद्ध ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार झाला आहे.

अजिंठा मार्गावरील कोलवडनजीकच्या राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये दोन पीडित विद्यार्थी दहावीत शिकत आहेत. ते दोघेही वसतिगृहात राहतात. मिलिटरी स्कूलमध्ये विज्ञान विषय शिकवणाऱ्या धर्मेंद्र उत्तम हिवाळे या विकृत शिक्षकाने प्रात्यक्षिकमध्ये कमी गुण देण्याची धमकी देत या विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. पीडित विद्यार्थ्यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार सदर शिक्षकावर ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी धर्मेंद्र हिवाळे हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here