Home तंत्रज्ञान Google प्ले स्टोअरच्या पॉलिसीत करणार मोठे बदल; अधिक सोप्या पद्धतीने करता येणार...

Google प्ले स्टोअरच्या पॉलिसीत करणार मोठे बदल; अधिक सोप्या पद्धतीने करता येणार कामे

405
0

Google हे सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास आपण ती गुगलवर शोधात असतो. तसेच गेम, फिटनेस किंवा अन्य संबंधित App डाउनलोड करतो ते गुगल Play store वरून करतो. आता मात्र गुगलने आपल्या प्ले-स्टोअर पॉलिसीमध्ये केलेल्या बदलांबद्दल माहिती दिली आहे. कंपनीने नवीन डेटा डिटेक्शन पॉलिसी सादर केली आहे. जे वापरकर्त्यांना त्यांच्या App मधील डेटावर आणि अधिक स्पष्टता आणि नियंत्रण ठेवण्यास परवानगी देणार आहे.

एक प्रकारे नवीन धोरण विकासकांसाठीही सकारात्मक काम करेल. जेव्हा विकसकांच्या अ‍ॅपची गोपनीयता आणि सुरक्षितता सहज समजू शकते, तेव्हा वापरकर्त्यांना अ‍ॅपवर विश्वास ठेवणे सोपे होणार आहे. Google Play Store अ‍ॅप्स अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि अ‍ॅप्स त्यांचा डेटा कसा वापरत आहेत हे समजून घेण्यात वापरकर्त्यांना मदत करण्यासाठी Google नवीन धोरणांवर काम करत आहे.

नवीन धोरणानुसार, गुगलने अ‍ॅप डेव्हलपर्सना एक टास्कही दिला आहे. Google ने डेव्हलपर्सना डेव्हलपर्स अ‍ॅप आणि ऑनलाइन दोन्हींमध्ये वापरकर्त्यांना त्यांची अकाऊंट आणि डेटा हटवण्याचा पर्याय देण्यास सांगितले आहे. Google वापरकर्त्यांसाठी त्यांचा डेटा डिलीट करण्याची प्रोसेस आणखी सोपी करण्यासाठी हे बदल करत आहे. यामुळे वापरकर्त्यांना App वापरत असताना नवीन अनुभव मिळेल. तसेच वापरकर्ते आपल्या डेटावर कंट्रोल करू शकणार आहेत.

Google ने असेही म्हटले आहे की, “हे फीचर डेव्हलपर्सना अधिक पर्याय ऑफर करण्यास देखील सांगत आहे. जे वापरकर्ते त्यांचे अकाउंट पूर्णपणे डिलीट करण्यास इच्छुक नाहीत ते फक्त इतर डेटा डिलीट करण्याचा पर्याय सिलेक्ट करू शकतात. ज्यामध्ये अ‍ॅक्टिव्हिटी, इतिहास, फोटोज किंवा व्हिडिओ इत्यादींचा समावेश असेल.” ब्लॉग पोस्टमध्ये, कंपनीने असेही म्हटले आहे की जर कोणताही डेटा डिलीट करण्यात आला असेल तर डेव्हलपर्सना तो वापरकर्त्यांना दाखवावा लागणार आहे.

सध्या गूगलने आपली नवीन पॉलिसी लागू केलेली नाही. गुगलने डेव्हलप्सर्सना महत्वाचे बदल करण्यासाठी काही मुदत दिली आहे. गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले, डेव्हलपर्सना ७ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तथापि, Google Play च्या वापरकर्त्यांना २०२४ च्या सुरुवातीला त्यांच्या Applications बदल दिसू लागतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here