Home परळी वैजनाथ सततच्या छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

सततच्या छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

833
0

परळी : घराजवळ राहणाऱ्या तरूणाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करून तिला त्रास दिला. हा त्रास असह्य झाल्याने त्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.१८) सायंकाळी परळी शहरातील सावतामाळी नगर येथे उघडकीस आली. याप्रकरणी त्या रोडरोमिओवर विनयभंग करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.
मयत १७ वर्षीय अल्पवयीन पीडिता परळीतील सावतामाळी नगर येथे राहत होती. तिच्या घराजवळ राहणारा मंगेश भास्करराव कोपनबैने (वय २९) हा तरूण तिला मागील वर्षभरापासून सतत त्रास देत होता. मंगेश नेहमी तिचा पाठलाग करून बोलण्यासाठी आग्रह धरत असे आणि मोबाईल नंबर मागून तिची छेड काढत होता. हा सततच्या त्रास असह्य झाल्याने पीडितेने अखेर बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली असे तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. सदर फिर्यादीवरून मंगेश कोपनबैने याच्यावर संभाजीनगर पोलीस ठाण्यात कलम ३०६, ३५४(ड) यासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here