Home मुंबई राज्याचा रिकव्हरी रेट झाला ९० टक्के

राज्याचा रिकव्हरी रेट झाला ९० टक्के

387
0

मराठवाडा साथी न्यूज
मुंबई :
राज्यातल्या कोविड रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे आता तब्बल 90 टक्क्यांच्यावर (रिकव्हरी रेट) गेले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने राज्याचा रिकव्हरी रेट वाढला आहे.


सोमवारी 10 हजार 225 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 15 लाख 24 हजारांवर गेली आहे. 4 हजार 9 नवे रुग्ण दिवसभरात आढळून आले. तर 104 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण हे 2.61 एवढं आहे. राज्यात सध्या 1 लाख 18 हजार 777 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दुसऱ्या लाटेसाठी सरकार सज्ज – टोपे
दिवाळीनंतर कोरोनाची महाराष्ट्रात दुसरी लाट येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावर सोमवारी (02) आपली भूमिका स्पष्ट केली. टोपे म्हणाले काही तज्ज्ञ अशा प्रकारची शक्यता व्यक्त करत आहे. अशा कुठल्याही लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे. सरकारने तयार केलेला टास्क फोर्स याबाबात अभ्यास करत असल्याचंही त्यांनी सांगितले.


मंदिराचा निर्णय दिवाळीनंतर
दिवाळीमुळे होणारी गर्दी आणि आलेला हिवाळा यामुळे दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकार सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत असून आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे टोपे यांनी सांगितले. राज्यात मंदिरं सुरू करण्याची मागणी होत आहे, त्यावर बोलताना टोपे म्हणाले, याबाबत अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री सगळ्यांशी चर्चा करून घेतील. दिवाळीनंतर त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here