Home औरंगाबाद कमाल तापमान पुन्हा‎ 36 अंशांवर पाेहाेचले‎ ; सकाळपासूनच होतोय उकाडा‎

कमाल तापमान पुन्हा‎ 36 अंशांवर पाेहाेचले‎ ; सकाळपासूनच होतोय उकाडा‎

808
0

औरंगाबाद :जिल्ह्यात रविवारी कमाल तापमान‎ ३६ अंश सेल्सिअसच्या उच्चांकावर‎ पाेहाेचले हाेते. त्यामुळे दुपारच्या‎ वेळी उन्हाच्या झळा तीव्र हाेत्या.‎ कमाल तापमानासाेबत या‎ आठवड्यात प्रथमच किमान‎ तापमान वाढले आहे . किमान तापमानाचा‎ पारा १६ अंश सेल्सिअवर हाेता.‎ जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात‎ कमाल तापमान उच्चांकी तर‎ किमान तापमान नीचांकी पातळीवर‎ हाेते. त्यामुळे तापमानात माेठी‎ तफावत निर्माण झालेली आहे.‎ रविवारी कमाल तापमान पुन्हा‎ एकदा ३६ अंश सेल्सिअसच्या‎ उच्चांकावर गेल्याने सकाळी ११‎ वाजेपासून उन्हाची तीव्रता वाढलेली‎ हाेती.दुपारी २ वाजेनंतर उन्हाच्या‎ तीव्र झळांनी भुसावळकर नागरिक‎ हैराण झाले हाेते.‎ रविवारी पहाटेच्या वेळी किमान‎ तापमान १६ अंश सेल्सिअसवर‎ असल्याने थंडीची तीव्रता गेल्या‎ आठवड्याच्या तुलनेत काहीसी‎ कमी झाल्याचे जाणवले. हवामान‎ विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार‎ २७ फेब्रुवारीपासून राज्यात‎ तापमानात वाढ हाेणार आहे. पारा‎ ४० अंशांपुढे जाऊ शकताे. तसेच‎ मार्चच्या पहिल्या आठवड्यात‎ अवकाळी पावसाची स्थिती देखील निर्माण‎ हाेऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here