Home इतर पतीची हत्या करून;आत्महत्येचा प्रयत्न…!

पतीची हत्या करून;आत्महत्येचा प्रयत्न…!

92
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : दिल्लीतील छतरपूर एक्स्टेंशन परिसरात रेणुका शर्मा या ३६ वर्षीय महिलेने अगोदर आपल्या पतीची(चिराग शर्मा)चाकू भोसकून हत्या केली.त्यानंतर तिने फेसबुकवर स्टेटस ठेवून हत्येची कबुली दिली आणि स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला.

या घटनेसंदर्भात अधिक माहिती देत दक्षिण दिल्लीचे डीसीपी अतुल ठाकूर यांनी सांगितले की,रेणुका मध्य प्रदेशातील उज्जैन येथे राहत होती. तिचा पती चिराग शर्मा हरयाणाच्या यमुनानगरमध्ये राहत होता.दोघेही एका इन्श्युरन्स कंपनीत काम करत होते. चिराग हा सेल्स विभागात तर रेणुका ही ऑपरेशन डिपार्टमेंटमध्ये काम करत होती.आठ वर्षांपूर्वी दोघांचा प्रेमविवाह झाला होता.ते छतरपूर एक्स्टेंशन परिसरात राहत होते.

सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार दोघांमध्ये सदैव भांडण होत होते.असेच भांडण शनिवारी(२ जाने.)रात्री झाले.भांडणात रेणुकाने चाकू भोसकून पतीची हत्या केली.त्यानंतर तिने फेसबुकवर स्टेटस ठेवून हत्येची कबुली दिली आणि स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला.पोलीस घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला.तेथे दोघे पती-पत्नी बेशुद्धावस्थेत पोलिसांना आढळून आले.पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून चिराग याला मृत घोषित केले.दरम्यान,महिलेवर उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here