Home Uncategorized ठाणे पोलीस संजय राऊतांच्या भेटीला नाशिकला, हॉटेलमध्येच चौकशी

ठाणे पोलीस संजय राऊतांच्या भेटीला नाशिकला, हॉटेलमध्येच चौकशी

493
0

नाशिक : जीवाला धोका असल्याचा खळबळजनक आरोप खा. संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे राऊत यांचा जबाब घेण्यासाठी ठाणे पोलीस नाशिकला पोहोचले आहेत. त्यातच राऊत यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आलीये. राऊत हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केल्यानंतर ठाणे पोलिसांकडून राऊत यांचा जबाब घेण्याचे काम सुरू आहे.

ठाण्याचे एसीपी राऊत यांच्या भेटीला नाशिकमध्ये पोहोचले. ठाणे पोलिसांच्या सहा जणांचे पथक नाशिकच्या हॉटेलमध्ये पोहोचले आहे. राऊतांच्या आरोपानंतर ठाणे पोलिसांकडून राऊत यांचा जवाब घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, राऊतांच्या पोलीस सुरक्षेत वाढ केली आहे. जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राऊतांची सुरक्षा वाढवली आहे. संजय राऊतांना नाशिक पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. मंगळवारपासून नाशिकमध्ये आलेले संजय राऊत आज सिन्नरकडे जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here