Home इतर ठाकरेंनी दिले तात्काळ चौकशीचे आदेश तर राष्ट्रपतींसह पंतप्रधानांनी व्यक्त केली हळहळ…!

ठाकरेंनी दिले तात्काळ चौकशीचे आदेश तर राष्ट्रपतींसह पंतप्रधानांनी व्यक्त केली हळहळ…!

23
0

मराठवाडा साथी न्यूज

भंडारा : संपूर्ण देशाला सुन्न करणारी घटना महाराष्ट्रातील भंडारा येथे घडली.काल(८ जाने.)मध्यरात्री भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला.त्यामुळे सर्वत्र खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे.रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडली असल्याचे आरोप मृत बालकांच्या नातेवाईकांनी केले आहेत.

या घटनेची दखल घेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इत्यादींनी या घटनेचा आढावा घेतला.तसेच राज्य शासनाकडून या घटनेच्या तात्काळ चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत.राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here