Home क्राइम राज ठाकरे विरोधात बेलापूर कोर्टाकडून वॉरंट जारी

राज ठाकरे विरोधात बेलापूर कोर्टाकडून वॉरंट जारी

13870
0

मुंबई : वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना आता 6 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.

26 जानेवारी 2014 रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी भडकावू भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर मनसेसैनिकांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here