Home आरोग्य केस गळतीवर काही खास टिप्स

केस गळतीवर काही खास टिप्स

240
0


हल्लीची बिघडलेली लाइफस्टाइल आणि खाण्यापीण्याच्या सवयी यामुळे लहान वयातच केस गळणे किंवा पांढरे होण्याची समस्या फारच सामान्य झाली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही समस्या भेडसावते. यासाठी लोक विविध केमिकल प्रॉडक्ट्स वापरतात. पण त्याने फायदा कमी आणि नुकसान जास्त होतं. त्यापेक्षा आपल्या आजीबाईच्या बटव्यातल्या एका उपायाने चांगलाच फरक पडतो. जाणून घेऊया.
केस गळती आणि पांढरे केस होणे यावर मेथी दाणे हे अत्यंत फायदेशीर ठरतात. हेल्थ एक्स्पर्टस सांगतात की, मेथी दाण्यांमध्ये निकोटीन अॅसिड आणि प्रोटीन असतं. यामुळे केसांचा ड्रायनेस दूर होतो. यात व्हिटॅमिन ए, सी, के, आयर्न, फॉलिक अ सिड, कॅल्शियम, पोटॅशियम सारखे पोषक तत्व आहेत. यामुळे केसांचे मूळ मजबूत होतात. त्यामुळे केस गळणे कमी होते.

१] २ चमचे मेथी दाणे घ्या, रात्रभर पाण्यात भीजवा. सकाळी हे दाणे मिक्सरमधून बारीक करून घ्या. ही पेस्ट केसांच्या मुळाशी नीट लावा. साधारण २०-२५ मिनीट ठेवून कोमत पाण्याने धुवा.आठवड्यातून २ वेळा हा उपाय केल्याने केसांचं गळणं कमी होऊन आधीसारखे काळे दिसू लागतील.

२] एका वाटीत नारळ तेल घ्या. त्यात १ चमचा मेथी दाणे टाका. ते तेल उकळवा. दाणे शिजल्यावर उतरवून घ्या.
हे तेल आठवड्यातून २ वेळा केस धुतल्यानंतर लावा. केसांच्या मुळाशी नीट मसाज करा.असं केल्याने केस मऊ होऊन मूळ मजबूत होतात.

३] मेथी दाणे रात्रभर पाण्यात भीजत ठेवा, या दाण्यांची पेस्ट करून त्यात लिंबाचा रस मिक्स करा.ही पेस्ट केसांच्या मुळाशी नीट लावा. अर्ध्या तासाने स्वच्छ पाण्याने धुवा.यामुळे केसांतला कोंडा बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here