Home नागपूर नागपुरातून सुटणाऱ्या सहा एक्‍स्प्रेस रद्द

नागपुरातून सुटणाऱ्या सहा एक्‍स्प्रेस रद्द

226
0

नागपूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड ते मनमाड दरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी बेलापूर, चितळी आणि पुणतांबा स्थानकादरम्यान लाईन डबलिंग प्रोजेक्टसाठी नॉन इंटरलॉकिंग करण्यात येणार आहे.

त्यामुळे नागपूर मार्गे धावणाऱ्या, नागपुरातून सुटणाऱ्या व समाप्त होणाऱ्या एकूण सहा एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

गाडी क्रमांक १२११४ नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेस २१ मार्चला रद्द करण्यात आली आहे. यासह २२ मार्चला १२११३ पुणे-नागपूर गरीबरथ एक्स्प्रेस आणि १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस २१ व २२ मार्चला आणि ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस २२ व २३ मार्चला रद्द करण्यात आली आहे.

१२१३५ पुणे-नागपूर एक्स्प्रेस २३ मार्चला धावणार नाही. यासह १२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसच्या २० व २१ मार्चला आणि २२ मार्चला १२१२९ पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला असून दोन्ही गाड्या नागपूर, बल्लारशाह, सिकंदराबाद, वाडी व दौंड मार्गे धावणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here