Home मराठवाडा शिवसैनिकांनी आगामी निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागावे – शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

शिवसैनिकांनी आगामी निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागावे – शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

2722
0

आगामी जिल्हा परिषद व नगर पालिकेवर भगवा फडकविण्याचा निर्धार

लातूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या धडाकेबाज कामामुळे विरोधकांना धडकी भरली आहे. त्यामुळेच विरोधक नाहक मुद्दे उचलून माध्यमाद्वारे चर्चा करत आहे. उचलली जीभ लावली टाळूला असे सध्या भाजपमध्ये सुरू आहे. परंतु हे फार काळ टिकत नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी येणाऱ्या निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागावे,असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. संपूर्ण मराठवाड्यात आगामी जिल्हा परिषद व नगर पालिकेवर भगवा फडकविण्याचा निर्धार करण्यात आला. लातूर ग्रामीण जिल्हा क्षेत्रातील अहमदपूर, उदगीर नगरपरिषद व चाकुर, जळकोट, रेणापूर नगरपंचायत तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका संबंधी महत्वपूर्ण बैठक विराज गार्डन येथे संपन्न झाली.
या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना नेते मराठवाडा संपर्कप्रमुख चंद्रकांत खैरे यांनी येणाऱ्या काळातील सर्व निवडणुका तोंडावर आल्या आहेत. शिवसैनिकांनी जनतेची सेवा करून, शेतकरी कष्टकरी कामगार बांधवांच्या हितासाठी काम करा. शिवसेना सदस्य नोंदणी करणे गरजेचे आहे. वार्ड तिथं शाखा घर तिथं शिवसैनिक अभियान यशस्वी करावे. शिवसैनिकांनी शिस्तीचे पालन केले पाहिजे. जो शिवसेनेशी वैर करत आहे. तो आपला दुश्मन आहे. निवडणुका पैसा फेकून जिंकता येत नाहीत, विजयी होण्यासाठीजनतेची काम करणे गरजेचे आहे.


मराठवाड्यातील प्रत्येक निवडणूक शिवसेना ताकतीने लढवण्यासाठी सक्षम आहे. मी तुमच्या पाठीशी खंबीरपने उभा राहीन. शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अत्यंत चांगली कामगिरी करत आहेत. ठाकरे सरकारच्या योजनांची माहिती जनतेसमोर मांडा. गोरगरिबांच्या मदतीला धावून जा. गावातील विकास कामासाठी निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे ही यावेळी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
या बैठकीस औरंगाबाद शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ जी स्वामी, माजी नगरसेवक वीरभद्र गादगे, शिवसेना महिला जिल्हा संघटक तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य सुनीता चाळक, माजी जिल्हाप्रमुख नामदेव चाळक, संतोष सोमवंशी, सुभाष दादा काटे, युवासेना जिल्हा युवा अधिकारी कुलदीप सूर्यवंशी, वैद्याकिय कक्षाचे जिल्हाप्रमुख अमर बुरबुरे, शिक्षक सेनाजिल्हा कार्याध्यक्ष सचिन साबणे, ग्रंथालय मराठवाडा समन्वयक दिनेश पाटील, माजी महिला जिल्हा संघटक मैना साबणे, अरूना लेंडाने, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब डोंगरे, अंगद पवार, सचिन दाणे, अहमदपूर विधानसभा संघटक तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य विलास पवार, उदगीर विधानसभा संघटक श्रीमंत सोनाळे, लातूर ग्रामीण विधानसभा संघटक कैलास पाटील, अहमदपूर तालुका प्रमुख विलास पवार हंगरगेकर, उदगीर तालुका प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, रेणापूर तालुका प्रमुख हरिभाऊ साबदे, लातूर ग्रामीण तालुका प्रमुख ऍड. प्रवीण मगर, चाकुर तालुका प्रमुख गुणवंत पाटील, अहमदपूर शहर प्रमुख तथा बाजार समितीचे संचालक भारत सांगवीकर, चाकुर शहर प्रमुख प्रल्हाद जाधव, मुरुडशहर प्रमुख दत्ता शिंदे, रेणापूर शहर प्रमुख गणपत कोल्हे, उदगीर शहर प्रमुख प्रा.दत्ता मोरे, लातूर ग्रामीण विधानसभा क्षेत्र प्रमुख राजकुमार, सुरवसे, माजी जी.प.सदस्य विवेकानंद पाटील, युवा सेना तालुका प्रमुख उपेंद्र काळेगोरे, उमाकांत इमडे, पांडुरंग बुंदराळे, नगरसेवक संदीप चौधरी, गोपाळ माने, माजी पंचायत समिती उपसभापती विठ्ठल फुलारी, पंचायत समिती सदस्य गोविंद मामा कोंपले, युवा सेना उपजिल्हाप्रमुख रमण माने, युवा सेना तालुका प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, सुभाष काटे, युवासेना जिल्हा युवा अधिकारी कुलदीप सूर्यवंशी, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या महिला जिल्हा संघटक सुनीता चाळक, श्रीमंत दादा सोनाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री बालाजी रेड्डी यांची भाषण झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संतोष रोडगे यांनी तर सूत्रसंचालन प्रा मारोती बुद्रुक पाटील, गणेश माने यांनी केले. कार्यक्रमास लातूर ग्रामीण जिल्हा क्षेत्रातील अहमदपूर, उदगीर,जळकोट, रेणापूर,चाकुर,लातूर ग्रामीण तालुका क्षेत्रातील युवा सेना पदाधिकारी सर्व उपतालूका प्रमुख ,तालुका संघटक, तालुका सचिव,विभाग प्रमुख, सर्कल प्रमुख,शाखा प्रमुख शिवसेना सलग्न संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनेक पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

शिवसेना नेते मराठवाडा संपर्क प्रमुख चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थिती शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली उदगीर भाजपा तालुका सरचिटणीस तथा शेकापुर ग्रामपंचायत सदस्य भगवान कांबळे, शेकापूर उपसरपंच नवनाथ शिंदे, काशिनाथ सावंत, चापोली कांग्रेस चे सरचिटणीस बालाजी कांबळे, शिंदगी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण बोईनावड, अहमदपूर राष्ट्रवादी काँग्रेस तालुका सरचिटणीस राम भारकड यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here