Home आरोग्य निरामय हॉस्पिटलचे बायोमेडिकल वेस्ट चक्क ग्रामपंचायतच्या घंटागाडीत

निरामय हॉस्पिटलचे बायोमेडिकल वेस्ट चक्क ग्रामपंचायतच्या घंटागाडीत

1907
0

मराठवाडा साथी न्यूज / औरंगाबाद
कोरोना काळात प्रत्येक गोष्टीची खबरदारी घेत असताना, चक्क मेडिकल वेस्ट रस्त्यावर तसेच ग्रामपंचायत मार्फत चालविल्या जाणाऱ्या घंटागाडीत टाकल्याची घटना वाळूज एमआयडीसी परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे घडली आहे. यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
याबाबत विस्तृत माहिती अशी की, वाळूज एमआयडीसी परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे डॉक्टर संतोष हिवाळे यांचे निरामय रुग्णालय नावाचे क्लिनिक आहे. या ठिकाणी परिसरातील शेकडो नागरिक उपचार घेत असतात.

उपचार करत असताना वापरलेले रिकामे सलाईन, इंजेक्शन, ग्लोज, मास्क, औषधांच्या रिकाम्या बाटल्या आदी विविध प्रकारचे बायोमेडिकल वेस्ट मुख्य रस्त्यावर व रांजणगाव ग्रामपंचायत मार्फत चालविण्यात येणाऱ्या घंटा गाडी क्रमांक एमएच 20, सीयु 0248 यामध्ये टाकण्यात आले होते. यावर गावातील काही नागरिकांनी आक्षेप घेऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याची तक्रार केली होती. याविषयी शालूताई भोकरे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी औरंगाबाद, पोलीस आयुक्त औरंगाबाद यांना निवेदन देऊन संबंधित दोषी डॉक्टर व ग्रामपंचायत वर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • हॉस्पिटलच्या सफाई कर्मचाऱ्याकडून अनावधानाने कचरा टाकताना बायोमेडिकल वेस्ट गाडीत टाकण्यात आला होता. ते लक्षात येताच ड्रॉयव्हरने सांगितले व आम्ही लगेच तो कचरा गाडीतून काढून घेतला. याबाबत आमचा प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंचनामा केला आहे. आम्ही त्या कचऱ्याची रीतसर विल्हेवाट लावली आहे. याबाबतच्या आमच्याकडे सर्व रीतसर पावत्या देखील आहे. : – डॉ. संतोष हिवाळे, संचालक, निरामय हॉस्पिटल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here