Home इतर राजकीय पुढाऱ्यांनी दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा…!

राजकीय पुढाऱ्यांनी दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा…!

31
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : सर्वत्र नवीनवर्षाचे आनंदाने स्वागत केले जात आहे.दरम्यान,भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद,उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू,पंतप्रधान नरेंद्र मोदी,संरक्षण मंत्री राजनाथ सिंह,काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सर्वच नेत्यांनी ट्विट करीत देशवासियांना नवीनवर्षाच्या शुभेछया दिल्या आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

“नव्या वर्षाच्या निमित्ताने, भारत आणि विदेशात राहणाऱ्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा.”

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू

“आपण २०२१ चे नवा उत्साह आणि सकारात्मकतेसोबत स्वागत करुया. “आपण आशा करुयात की, आपण धैर्य, आत्मविश्वास आणि एकात्मकतेसोबत आव्हानांचा सामना करुयात. गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्तम आरोग्य, आनंद आणि सामंजस्याने जगात २०२१ ची सुरुवात करुयात. मी सर्व नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी

“तुम्हाला २०२१ च्या हार्दिक शुभेच्छा! हे वर्ष उत्तम आरोग्य, आनंद आणि समृद्धि घेऊन येवो. अपेक्षा आणि कल्याण होण्याची भावना प्रबळ होत जावो.”

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

“तुम्हा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आयुष्यात सुख, समृद्धि, शांति आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, या माझ्या सदिच्छा.”

काँग्रेस नेते राहुल गांधी

“नव्या वर्षाच्या सुरुवातीला आपण त्या लोकांना आठवूयात ज्यांना आपण गेल्या वर्षभरात गमावले आणि त्या सर्वांचे आभार मानूयात,ज्यांनी या संकटाच्या काळात आपल्या सर्वांचे रक्षण केले.तसेच वेळीच आपल्यासाठी बलिदान दिले.मी शेतकरी आणि मजुरांच्या अन्याय आणि सन्मानाच्या लढाईत त्यांच्यासोबत आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here