Home समाज शबरीमला मंदिर आज होणार ‘खुले’…!

शबरीमला मंदिर आज होणार ‘खुले’…!

279
0

मराठवाडा साथी न्यूज

तिरुवनंतपुरम : दरवर्षी होणाऱ्या ‘मकरविलक्कू’ उत्सवासाठी आज(३० डिसें)संध्याकाळी ५ वा.केरळचे प्रसिद्ध शबरीमला मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे.त्रावणकोर देवसोम बोर्डने दिलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, ३१ डिसें. ते १९ जाने. पर्यंत दर्शनासाठी हे मंदिर खुले राहणार आहे.

दर्शनासाठीचे नियम आणि अटी

  • २८ डिसें. पासून दर्शनासाठी मंदिराच्या वेबसाइटवरुन क्यू बुकिंग करता येणार आहे. त्या आधारे रोज केवळ ५ हजार भाविकांना दर्शन देण्यात येणार असल्याचं बोर्डने स्पष्ट केलं आहे.
  • भाविकांना कोविड १९ चे निगेटिव्ह प्रमाणपत्रक बंधनकारक असणार आहे.
  • मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ४८ तासांपूर्वीचा कोरोना निगेटिव्ह अहवाल सादर करावा लागणार आहे.प्रमाणपत्रक नसेल तर त्यांना अयप्पा मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
  • मंदिरा नजीकच्या परिसरात कोरोना चाचणीची कोणतीही सुविधा उपलब्ध नसणार असल्याचे बोर्डने स्पष्ट केले आहे.

दरम्यान,मकरविलक्कू उत्सवाच्यावेळी सलग ४१ दिवस या मंदिरात पूजा करण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here