Home बीड बांधकाम मिस्त्रीचा साखरझोपेतच मजुराने केला खुन

बांधकाम मिस्त्रीचा साखरझोपेतच मजुराने केला खुन

आष्टी तालुक्यातील देविनिमगांव येथील घटना, बांधकामावर बुधवारी पहाटे गाड झोपेत असलेल्या बांधकाम मिस्त्रीच्या डोक्यात दगड घालून खुन केल्याची घटना बुधवारी दि.26 उघडकीस आली. आरोपी मजुरास आंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

209
0

मराठवाडा साथी न्यूज

आष्टी : तालुक्यातील देविनिमगांव येथे सुरू असलेल्या बांधकामावरती काम आटपून गवंडी व मजुर बांधकामावरती झोपले होते.गुरुवारी सकाळी पहाटेच्या गाढ झोपेत असलेल्या गवंडी ईश्वर दत्तु नवसुपे वय २७ याच्या डोक्यात दगड घालून मजुरानेच खून केल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली.आरोपी मजूर कांतीलाल मारूती काकडे (४० ) यास अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील देविनिमगांव वस्तीवर गोरख पाचारणे यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. हे काम मंगरूळ येथील गवंडी ईश्वर दत्तु नवसुपे आणि मजूर कांतीलाल मारूती काकडे करत आहेत. दोघेही बुधवारी काम आटोपून बांधकावरच झोपले होते. गुरूवारी पहाटे साडेसहाच्या दरम्यान मजूर कांतीलाल याने गाढ झोपेतील ईश्वर नवसुपे यांच्या डोक्यात दगड घातला. यात ते गंभीर जखमी झाले.

यानंतर मजुराने घराच्या मालकाच्या चारचाकी कारवरही ( MH.02,DJ.2574 ) दगडफेक केली आहे.घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पोलिस उपनिरीक्षक राहुल लोंखडे, पो.ह.राजेंद काकडे,चंद्रकांत काळकुटे,संतोष सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

 पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेत गंभीर जखमी ईश्वर यास अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डाॅक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात गोरख नारायण पाचारणे यांच्या फिर्यादी वरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here