Home इतर तलवार, कुऱ्हाड, लाकडी दांडके घेऊन फोटोसेशन…!

तलवार, कुऱ्हाड, लाकडी दांडके घेऊन फोटोसेशन…!

95
0

मराठवाडा साथी न्यूज

पंढरपूर : सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील पिसेवाडी येथील सात तरुणांना मात्र हातात हत्यारे घेऊन फोटो काढणे अंगलट आले आहे. पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.माळशिरसच्या पिसेवाडीतील शहाजी इंगळे, दीपक भाकरे, शैलेश भाकरे, महेश भाकरे, सागर चव्हाण, सतीश इंगळे आणि समाधान भाकरे या सात तरुणांनी हातात तलवार, कुऱ्हाड आणि लाकडी दांडके घेऊन फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर अपलोड केले होते.

हे फोटो व्हायरल होताच अकलूज पोलिसांनी ताबडतोब या सात जणांचा शोध घेत कारवाई केली. या तरुणांचा इरादा काय होता? हातात हत्यारं घेऊन काय करायचं होतं? असे प्रश्न उपस्थित झाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यांच्यावर आर्म्स अ‌ॅक्ट आणि मुंबई पोलीस कायदा कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

प्रसिद्धीसाठी अनेक जण सोशल मीडियावर काही ना काही करत असतात. त्यामध्ये एखादी वादग्रस्त पोस्ट असो वा असे फोटो काढणे अशा गोष्टींचा समावेश असतो. परंतु दहशत माजवण्यासाठीही काही जण शस्त्रांसोबतचे फोटोही पोस्ट करत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here