Home नाशिक डॉ. आंबेडकर भवन पाडल्याचा मुद्दा विधानसभेत

डॉ. आंबेडकर भवन पाडल्याचा मुद्दा विधानसभेत

226
0

अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडणाऱ्यांविरुद्ध कारवाई व्हावी म्हणून सुरू असलेल्या आंदोलनाचा मुद्दा आज मुंबई येथे विधानसभेत उपस्थित झाला. आमदार विकास ठाकरे यांनी या महिलांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी केली.

डॉ. आंबेडकर भवन पाडण्यांविरुद्ध गुन्हे दाखल व्हावे, ही जमीन शासनाने खासगी कंपनीकडून परत घ्यावी आणि त्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात यावे. या मागण्यांसाठी अंबाझरी उद्यानाजवळ महिलांचे साखळी उपोषण सुरू आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने उद्यानाची २४ एकर आणि डॉ. आंबेडकर स्मारकाची २० एकर जमीन अशी एकूण ४४ एकर जमीन मे. गरुडा ॲम्युझमेंट पार्क लि. या कंपनीला विकसित करण्यासाठी दिली आहे. या कंपनीचे संचालक नरेंद्र जिचकार यांनी डॉ. आंबेडकर भवन पाडले आणि येथील झाडेही कापली, असा आरोप डॉ. आंबेडकर स्मारक (अंबाझरी) बचाव समितीचा आहे. विकासक वेगवेगळ्या माध्यमांतून आंदोलनकर्त्यांवर दबाव निर्माण करीत आहे. यासंदर्भातील पत्र आमदार विकास ठाकरे यांना देण्यात आले आहे. त्यानंतर आज ठाकरे यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला.

ते म्हणाले, अंबाझरी येथील डॉ. आंबेडकर भवन पाडण्यात आले. त्याविरोधात आंबेडकरी समाजाच्या ५०० महिला गेल्या ५० दिवसांपासून साखळी उपोषण करीत आहेत. नागपुराच्या हिवाळी अधिवेशनात मोर्चा देखील काढण्यात आला होता. परंतु, आता या आंदोलनकर्त्यांना धमकावण्याचे प्रकार होत आहे. ज्या कंपनीला ही ४४ एकर जागा जमीन विकसित करण्यास देण्यात आली आहे. त्या कंपनीकडून हा प्रकार होत आहे. मला यासंदर्भातील पत्र मिळाले आहे. ५० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र, शासनाकडून कुठलीही दखल घेतली गेली नाही. भर उन्हात उपोषण करीत असलेल्या या महिलांची शासनाने दखल घ्यावी आणि त्यांच्या मागण्यांवर विचार करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here