Home अंबाजोगाई सावित्रीमाई फुले यांच्यामुळेच आज महिला उच्चपदस्थ पदांवर — आ.नमिता मुंदडा

सावित्रीमाई फुले यांच्यामुळेच आज महिला उच्चपदस्थ पदांवर — आ.नमिता मुंदडा

185
0

अंबाजोगाई

आज अनेक क्षेत्रामध्ये महिला या चांगल्या तसेच उच्चपदस्थ पदांवर विराजमान आहेत हे केवळ सावित्रीमाई फुले यांच्या संघर्षामुळेचं असून त्यांनी त्याकाळात स्त्रीयांना शिक्षणासाठी प्रभावित केले आणि सर्व महिलांना याचा आज फायदा झालेला दिसतोय असे गौरव्दगार केज मतदार संघाच्या आ.नमिता मुंदडा यांनी सेंट अँन्थोनी शाळेतील आयोजित सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त काढले.

यावेळीव्यासपीठावरआ.सौ.नमिता मुंदडा,अध्यक्षा म्हणून जि.प अध्यक्षा सौ.शिवकन्या सिरसाट,
प्रमुख उपस्थिती मध्ये मुख्याध्यापिका प्रतिभा देशमुख,
नगरसेविका सौ.सविता लोमटे,
नगरसेविका सौ.जयश्री साठे,
डॉ.सुनिता बिराजदार,सौ.अंजली
चरखा (इन्नरव्हिलग्रुप),नगरसेविका सौ.वासंती बाबजे सेवानिवृत्त प्रा.सौ.जयश्रीआरसुडे योगशिक्षिका सौ.सुगंधा सोमवंशी डॉ.सौ.ज्योती
धपाटे,नगरसेविका सौ.उज्वला पाथरकर,नगरसेविका सौ.शिल्पा गंभीरे,योग शिक्षिका सौ.मनिषा इंगळे,नगरसेवक सारंग पुजारी,डॉ. बालासाहेब लोमटे,डॉ.सुरेश आरसुडे,बालासाहेब पाथरकर,
शेंगुळे सर,संतोष चोपणे,चंद्रकांत हजारे,भाऊराव गवळी,पत्रकार राम जोशी,आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

सर्वप्रथम सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते हार पुष्प अर्पण करण्यात आले त्यानंतर गायक प्रकाश बोरगावकर व त्यांच्या टिमने जिजाऊ वंदना आणि सावित्रीमाई फुले यांचे गीत सादर केले.यानंतर डॉ.अरुणा केंद्रे (दहिफळे)वैद्यकीय अधिक्षक स्त्री रुग्णालय लों.सावरगाव श्रीमती सुरेखा खंडाळे मुख्याध्यापिका, सो. वि.कन्या शाळा घाटनांदूर,सिस्टर फातिमा सुपरवायझर,सेंट अँन्थनी स्कूल,सौ.सुरेखा म्हेत्रे
अधिपरिचारिका,उपरुग्णालाय केज सौ.प्रियंका काळे स्टाफ नर्स स्वा.रा.ती अंबाजोगाई,कु.अर्चना रोडगेएम.बी.बी.एस.जे.जे. हॉस्पिटल मुंबई,सौ.सविता कराड या सर्व सावित्रींच्या लेकींचा भव्य असा सत्कार व सन्मान सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

पुढे बोलताना आ.मुंदडा म्हणाल्या की,आज आपण पहात आहोत भारतात सर्व ठिकाणी महिला या अग्रेसर आहेत.यात अमेरिका चा विचार केला तर याठिकाणी पण भारतीय महिला ही उपपंतप्रधान आहे,हे कोणामुळे शक्य झाले तर ते सावित्रीमाई मुळे कारण त्यांनी त्याकाळात शिक्षणासाठी आपल्या अंगावर चिखल,शेण लोकांचा त्रास सहन केला नसता तर अजूनही सर्व महिला या घर आणि चूल इथपर्यंतच
मर्यादित राहिली असती.म्हणून आज याठिकाणी उपस्थित महिलांनी आपल्या मुलींना जास्तीत जास्त शिक्षण द्यावे आणि मोठा अधिकारी बनवावे, कारण आमच्या घरात पण आम्ही दोन मुली आहेत आम्हाला आमच्या आईवडिलांशी शिकविले मी सध्या इंजिनिअर आहे.आजच्या दिवशी माझ्या सर्व भगिनींना ऐवढीच विनंती आहे की,आपण शिक्षण हे जरूर घ्यावे परंतू याचबरोबर योगांची पणजोड असावी कारण योग आहेत तर आपण आहोत.आपण जर रोज योगासने केली तर आपले व कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य तंदुरुस्त राहील.

अध्यक्षीय भाषणात जि.प अध्यक्षा शिवकन्या सिरसाट म्हणाल्या की,आजच्या जयंतीच्या दिवशी आपण एकच लक्षात ठेवले पाहिजे की,सावित्रीमाईंनी दिलेल्या शिकवणीतून आपण आपले कार्य केले पाहिजे तसेच आजच्या धावपळीच्या युगात योगासने करणे अत्यंत गरजेचे आहेत कारण योगासनामुळे आपला स्वभाव,
आरोग्य एकदम चांगले व सदाही आनंदी राहते कारण मी मागील तीन वर्षांपासून योगासने करते आणि याचा मला अनुभवही आलेला आहे असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.यशवंत आरसुडे व योगासनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंगळे यांनी केले.सध्या कोरोणाची परीस्थिती असल्यामुळे सर्व कार्यक्रमातील प्रेक्षकांना नेहरू युवा मंडळ कळंब व ग्राम ऊर्जाफाउंडेशनअंबाजोगाई यांच्या वतीने सावित्रीबाई फुले
जयंतीनिमित्त दोनशे मास्क वाटप करण्यात आले.याप्रसंगी
मंडळाचेअध्यक्ष ज्योतीराम सोनके बनसारोळकर व संचालिका स्वाती अडसुडे उपस्थित होते. या शिक्षक दाम्पत्याने संपूर्ण कोरोना काळात एन 95 मास्कचे केज अंबाजोगाई कळंब,उस्मानाबाद,तुळजापूर तालुक्यात 5000 मास्कचे मोफत वाटप केलेले आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले समितीचे संचालक अनंत आरसुडे,
संतोष जिरे,बळीराम चोपणे,यशवंत
आरसुडे,उज्जैन बनसोडे,योगगुरू परमेश्वर भिसे,पवन जिरे,अँड.संतोष पवार,प्रदीप चोपणे,संजय आरसुडे,भाऊराव गवळी,नागोराव पवार,राहुल माळी,महादेव आरसुडे,धनंजय शिंदे,अशोक आरसुडे,अमोल साखरे,अविनाश उगले,गोरेसर,आडे सर,नितीन जिरे,गजानन घोडके,पंकज राऊत व इतर सर्वांनी परीश्रम घेतले.
याप्रसंगी शहर व परिसरातील सर्व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.ज्योती शिंदे यांनी केले तर आभार बळीराम चोपणे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here