Home क्रीडा रोहित शर्माची ३५ धावांचीच खेळी, नावावर केला हा मोठा पराक्रम

रोहित शर्माची ३५ धावांचीच खेळी, नावावर केला हा मोठा पराक्रम

601
0

कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात २१ धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७ हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो भारताचा ७ वा आणि एकूण २८ वा खेळाडू ठरला आहे. चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात रोहित शर्मा ३५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
रोहित शर्माने विराट कोहली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, एमएस धोनी आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या १७ हजारी क्लबमध्ये सामील झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत ६६४ सामन्यांमध्ये ४८.५२च्या सरासरीने ३४,३५७ धावा केल्या. सचिनशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला ३० हजार धावांचा आकडा पार करता आलेला नाही.
रोहित शर्माने आतापर्यंत ४९ कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने ४६.७६ च्या सरासरीने ३३६५ धावा केल्या आहेत. हिटमॅनने रेड बॉल क्रिकेटमध्ये ९ शतके आणि १४ अर्धशतके झळकावली आहेत. रोहित शर्माने २४१ एकदिवसीय सामन्यांमध्ये४८.९१ च्या सरासरीने १०,८८३ धावा केल्या आहेत. टी-20 बद्दल बोलायचे झाले तर, १४८ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या रोहितने या फॉरमॅटमध्ये ३० च्या सरासरीने ३८५३ धावा केल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here