Home महाराष्ट्र ‘शिवसेना स्वबळावर भगवा फडकवणार हे मी गेल्या ३० वर्षांपासून ऐकतोय’

‘शिवसेना स्वबळावर भगवा फडकवणार हे मी गेल्या ३० वर्षांपासून ऐकतोय’

436
0


शरद पवारांचा शिवसेनेला सणसणीत टोला
नाशिक । महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वबळाच्या घोषणेवरून शिवसेनेला चिमटा काढला, ते म्हणाले की, शिवसेना स्वबळावर भगवा फडकवणार हे मी गेल्या ३० वर्षांपासून ऐकत आलोय’. त्याचवेळी सगळ्याच नेत्यांना आपला पक्ष मोठा करण्याचे स्वातंत्र्य असल्याची पुस्टी जोडत उद्धव ठाकरे यांचे म्हणणे गैर गैर नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण सध्या चर्चेत आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी ठाकरी शैलीत भाजपचा समाचार घेतला. त्यानंतर मंगळवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरून जोरदार उत्साह शिवसेना जिल्हाप्रमुखांमध्ये दिसला. या पार्श्वभूमीवर सर्वांना संबोधित करताना उद्धव यांनी स्वबळाचा नारा दिला. आपल्याला महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवायचा आहे. त्यादृष्टीने आपण आतापासूनच तयारीला लागले पाहिजे, असे आदेशच उद्धव यांनी दिले. उद्धव यांच्या या आदेशाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या असताना शरद पवार यांनी यावर जोरदार टोला लगावला.
महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवाव्या का?, असा प्रश्न विचारला असता हा निर्णय इतर पक्ष आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घ्यावा, असा सल्ला पवार यांनी दिला. भाजपला दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत आणि लोकांना हे सरकार आवडतं आहे. त्यामुळे जनतेच्या भल्यासाठी निर्णय घ्या हा माझा तिन्ही पक्षांना सल्ला असेल, असेही पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here