Home राजकीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 बड्या नेत्यांची बंडखोरी!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 बड्या नेत्यांची बंडखोरी!

105
0

राजकारणात नेहमीच काही काही चालू असत.राज्यातलं सत्तांतर, भाजपाची वाढती ताकद, महाविकास आघाडीतील पक्षांचा गोतावळा, ही सगळी आव्हानं पेलताना पक्षीय संघटन मजबूत ठेवणं हे प्रत्येक पक्षासमोरचं मोठं आव्हान आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची गेल्या काही दिवसांपासून वाताहत सुरु आहे. काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक आणि नांदेड येथील दोन नेते राष्ट्रवादीतून बाहेर पडले आहेत. यापैकी एक नाव पवारांशीच संबंधित आहे. नाशिकमधून अमृता पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्या आज मुंबईत भाजपात प्रवेश करतील. तर मराठवाड्यातले महत्त्वाचे शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली आहे. ते लवकरच बीआरएस पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा आहे.

माजी विधानसभा आमदार वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार या आज भाजजापात प्रवेश करणार आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आणि महिला नेत्या म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या आक्रमक चेहरा आहेत.. बारामतीच्या पवार कुटुंबियांशी नाशिकच्या पवार कुटुंबांचं जवळचं नातं होतं. मात्र वसंतराव पवार यांच्या निधनानंतर ते काहीसं कमी झालं. अमृता पवार या काही काळ सुप्रिया सुळे यांच्याही निकटवर्तीय होत्या. मात्र २०१९ च्या निवडणुकीत निफाड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकिट न मिळाल्याने अमृता पवार नाराज होत्या. पक्षाचं तिकिट मिळावं म्हणून लॉबिंग करूनही अमृता पवार यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर त्या भाजपात जाण्याच्या चर्चा होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. अमृता पवार आज मुंबईतील एका कार्यक्रमात भाजपात प्रवेश करतील.

तर शंकर अण्णा धोंडगे हे शेतकरी संघटनेतील मोठं नाव आहे. किसानभारती नावाची स्वतंत्र संघटना त्यांनी काढली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळावर ते नांदेड जिल्ह्यातील लोहा- कंधार मधून ते विधानसभेत पोहोचले होते. याच धोंडगे यांनी हैद्राबादमध्ये जाऊन काही दिवसांपूर्वी के चंद्रशेखर राव यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं होतं. शंकर अण्णा धोंडगे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. शंकर अण्णा धोंडगे यांनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवला आहे. यासंदर्भात सोशल मीडियावरचं त्यांचं पत्रही व्हायरल झालं आहे. शंकर अण्णा धोंडगे हे तेलंगणातील मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएस पक्षात शामिल होण्याची दाट शक्यता आहे. देशातील ज्या विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलं होतं. त्यात बीआरएसच्या चंद्रशेखर राव यांचाही समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here