Home व्यवसाय इंडियन बँकेत आता तब्बल 203 रिक्त जागांसाठी भरती

इंडियन बँकेत आता तब्बल 203 रिक्त जागांसाठी भरती

397
0

मुंबई: इंडियन बँक इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विशेषज्ञ अधिकारी (वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक)या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 असणार आहे.
विशेषज्ञ अधिकारी (वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक) वर्क फ्रॉम होम अश्या अनेक जागांसाठी लवकरच पात्र विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरू शकतात.

पात्रता

विशेषज्ञ अधिकारी (वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक) -या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार CA / ICWA Or MBA (Finance) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

अर्ज शुल्क

SC/ ST/ PWBD उमेदवारांसाठी – 175/- रुपये

इतर उमेदवारांसाठी – 850 /- रुपये

आवश्यक कागदपत्रे

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/ibpssofeb23/ या लिंकवर क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here