Home क्राइम जिल्हा बँकेतील तिजोरीसह पावणे सात लाखाची चोरी

जिल्हा बँकेतील तिजोरीसह पावणे सात लाखाची चोरी

410
0

मराठवाडा साथी न्यूज
परतूर । जालना जिल्हा बँकेच्या वाटुर शाखेतून जवळपास पावणेसात लाखांच्या रोख रक्कमेसह चोरट्यांनी तिजोरी लंपास केली आहे. ही घटना गुरूवारी (दि. 22) सकाळी लक्षात आली. हुशार चोरांनी सीसीटीव्हीसह टेबल फॅन, इन्व्हरर्टर, बॅटरीही नेली चोरून. या घटनेमुळे शहरात वाटूर येथे व्यापाऱ्यांत भितीचे वातावरण पसरले अाहे.
चोट्टे भलतेच हुशार
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच चोरींनी फोडली नाही, तर ती फोडल्यावर आपल्यापर्यंत पोलिस पोहचू नये, म्हणून त्यांनी त्या बँकेत लावलेले सीसीटिव्ही कॅमेरे आणि इतर साहीत्यही चोरून नेले. अगदी तिजोरीही तिथे ठेवली नाही. त्यावरून चोर टेक्नोसॅव्ही आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान जाणणारे असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
चॅनल गेट तोडले
वाटुर (ता. परतूर) येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. नेहमी प्रमाणे अधिकारी, कर्मचारी बॅंकेचे कामकाज आटोपून निघून गेले. मात्र, बुधवारी रात्री जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचे चॅनल गेटचे कुलूप तोडून बँकेत प्रवेश केला. चोरट्यांनी थेट बँकेची लोखंडी तिजोरी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिव्हीआर गायब केला.
तिजोरीत ६ लाख ६२ हजार रोख
या तिजोरीत रोख ६ लाख ६२ हजार ९०० रुपये होते. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. रोख रक्कमेसह लोखंडी तिजोरी व टेबल फॅन, इन्व्हर्टर, बॅटरी, एक मॉनिटर असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. पीएम किसान सन्मान योजनेचे अनुदान शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी आले होते. निराधार मानधन ही जमा झाले होते. मात्र अनुदान वाटप करण्यापूर्वीच चोरट्यांनी बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारला आहे.
बँकेतर्फे परतूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस निरक्षक शिरीष हुंबे करीत आहेत. दरम्यान, चोरट्यांनी बँक फोडून तिजोरी लंपास केली आहे. या घटनेमुळे बँक क्षेत्रासह व्यापाऱ्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे या चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर कडवे आव्हान निर्माण झाले आहे. या चोरट्यांना तपास कधी लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here