Home मनोरंजन दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त “द काशिमर फाइल्स वर ” वर प्रकाश राज...

दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त “द काशिमर फाइल्स वर ” वर प्रकाश राज यांचे ट्विट

406
0


एका सामाजिक संस्थेकडून दिला जाणार पुरस्कार आहेत. काही दिवसांपूर्वी दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला.सामाजिक संस्थेकडून दिला जातो. या सोहळ्यात विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाने बाजी मारली आहे. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाला पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विटरवर ट्वीट शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश राज यांनी एका आर्टिकलचा स्क्रिनशर्ट शेअर केला आहे. या स्क्रिनशर्टला शेअर करुन कॅप्शनमध्ये त्यांनी दोन हॅशटॅग्सचा वापर केला. प्रोपोगंडा फाइल्स आणि जस्ट आस्ककिंग हे दोन हॅशटॅग्स प्रकाश राज यांच्या या ट्वीटमध्ये दिसत आहेत. प्रकाश राज यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.
एका कार्यक्रमात प्रकाश राज यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर टीका केली होती. ते म्हणाले होते, ‘द कश्मीर फाइल्स’ हा एक नॉनसेन्स चित्रपट आहे, आंतरराष्ट्रीय ज्युरी त्याच्यावर थुंकतात. ते अजूनही निर्लज्ज आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक स्वतःहून विचारतायत, ‘मला ऑस्कर का मिळत नाही?’”असे ट्विट प्रकाश राज यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here