Home क्राइम बापरे ! परदेशी महिलेकडून चक्क ‘६ कोटींचे’ कोकेन जप्त

बापरे ! परदेशी महिलेकडून चक्क ‘६ कोटींचे’ कोकेन जप्त

181
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : मुंबई विमातळावर महसुल गुप्तवार्ता संचलनालयाने कारवाई करून एका परदेशी महिलेला चक्क १ किलो कोकेनसह अटक करण्यात आले आहे.डी .आर.आय ने महिलेकडून जप्त केलेल्या कोकेनची किंमत तब्बल ‘६ कोटी’ रुपये आहे.

डीआरआयला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती. त्यात ‘एलेना कसाकातिरा’ या ४३ वर्षीय परेदशी महिलेला अटक करण्यात आली. हि परदेशी महिला मूळ पूर्व आफ्रिकेतील ‘मालवीची’ नागरीक आहे. ती अदिस अबाबा विमातळावरून दुबईमार्गे मुंबईत दाखल झाली होती.मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमातळवर सोमवारी ती आल्यानंतर तिला थांबवण्यात आले. तिच्याकडील ट्रॉलीमध्ये ड्रग्स असल्याची गुप्त माहिती केंद्रीय यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार तपासणीत ट्रॉलीमधील गुप्त जागेत दोन पाकीटे सापडली.

या परदेशी महिलेकडून एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत कोकेन जप्त करण्यात आल्याचे तेथीलअधिका-याने सांगितले. त्यानंतर या महिलेला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने तिला डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here