Home जालना डॉ. विजय चोरमारे यांना‎ “दु:खी” राज्य पुरस्कार घोषित‎

डॉ. विजय चोरमारे यांना‎ “दु:खी” राज्य पुरस्कार घोषित‎

414
0


जालना‎:स्व. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट‎ आणि अनुभव प्रतिष्ठानच्या संयुक्त‎ ‎ विद्यमाने सुप्रसिद्ध‎ ‎ उर्दू शायर कै. राय‎ ‎ हरिश्चंद्र साहनी‎ ‎ यांच्या‎ ‎ स्मृतिप्रीत्यर्थ दिला‎ ‎ जाणारा “दु:खी”‎ ‎ राज्य काव्य‎ पुरस्कार कोल्हापूर येथील कवी,‎ लेखक, संपादक, चरित्रकार, डॉ.‎ विजय चोरमारे यांना जाहीर झाला.‎ पुरस्काराचे हे रौप्य महोत्सवी वर्ष‎ आहे. २५ हजार रुपये रोख, स्मृती‎ चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.‎ गुढीपाडव्याला म्हणजेच २२ मार्च सायंकाळी‎ ६.३० वाजता जे.ई.एस.‎ महाविद्यालयाच्या प्रांगणात “कवितेचा‎ पाडवा ” या गाजलेल्या कार्यक्रमात‎ सिने-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या‎ हस्ते व ज्येष्ठ लेखक डॉ. प्रल्हाद‎ लुलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत‎ पुरस्कार वितरीत होईल.‎ मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत‎ संयोजक अभय साहनी, विनीत‎ साहनी, लेखिका, कवयित्री डॉ.‎ संजीवनी तडेगांवकर, अनुभव‎ प्रतिष्ठानचे सचिव पंडितराव‎ तडेगावकर यांनी पुरस्काराची घोषणा‎ केली. पुरस्कार वितरणानंतर नागराज‎ मंजुळे व डॉ. विजय चोरमारे यांची‎ मुलाखत डॉ. संजय चौधरी‎ (करमाळा) आणि डॉ. संजीवनी‎ तडेगावकर घेणार आहेत. या वेळी‎ दोन्ही मान्यवरांची सुरेल काव्य मैफल‎ तसेच कार्यक्रम स्थळी प्रसिद्ध‎ चित्रकार राजू बाविस्कर (जळगाव)‎ यांच्या चित्रांचे प्रदर्शन पहावयास‎ उपलब्ध असेल, तरी रसिकांनी लाभ‎ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.‎

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here