Home आरोग्य भारत बायोटेककडून नव्या गाईडलाईन्स जारी…!

भारत बायोटेककडून नव्या गाईडलाईन्स जारी…!

420
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : सुरुवातीला कोवॅक्सीन लस आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच,फ्रंट लाईन वर्कर्स यांच्या सोबतच आजारी रुग्णांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते.मात्र कोवॅक्सीन लसी संदर्भात भारत बायोटेकच्या वतीन गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या असून त्यामधून काही आजार असणाऱ्या,तसेच गरोदर महिलांनी लस घेऊ नये असे स्पष्ट करण्यात आले आहे.

यांनी घेऊ नये कोवॅक्सीन लस

  • ज्या व्यक्तींना रक्ता संबंधित आजार आहेत किंवा ब्लड थीनर्सचा त्रास आहे.
  • सध्या जे व्यक्ती आजारी आहेत, किंवा मागील काही दिवसांपासून ताप अथवा एखाद्या गोष्टीची अ‍ॅलर्जी आहे.
  • गरोदर महिला आणि ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या महिला म्हणजेच, नवजात बालकांच्या मातांनीही लस घेऊ नये.

दरम्यान,कोस्क्सिन लसीची सुरक्षा, तिचा दर्जा, त्यामुळे होणारे परिणाम यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.त्यावेळी भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एल्ला यांनी कोवॅक्सीन २०० टक्के सुरक्षित असल्याचे सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here