Home होम मॅसेजिंग अ‍ॅप्स Hike’ कायमचा बंद…!

मॅसेजिंग अ‍ॅप्स Hike’ कायमचा बंद…!

232
0

मराठवाडा साथी
नवी दिल्ली :सोशल मीडियाच्या जगतात जरी भारतीय नागरिक मेड इन इंडिया सोशल मीडिया अ‍ॅप्सची मागणी करत असले तरी, सत्य मात्र वेगळेच आहे. भारतीय नागरिक स्वत: मेड इन इंडिया सोशल मीडियाच्या अ‍ॅप्सला पसंती देत नाही. याचे उदाहरण म्हणजे Hike. भारतात तयार करण्यात आलेल्या या सोशल मीडिया अ‍ॅप्सला आपल्या भारतीयांनीच पसंती न दिल्याने अवघ्या दोन वर्षाच्या आत Hike बंद पडलं आहे. याची माहिती स्वत: Hike चे संस्थापक आणि सीईओ भारती मित्तल यांनी दिली आहे. Hike Sticker chat या अ‍ॅप्सला Hike या नावाने सुद्धा ओळखले जात होते.
काही दिवसांपुर्वीच मित्तल यांनी ट्विट करत सांगितले होती की, ‘Hike ला बंद करण्याची वेळ आली असून, जानेवारी 2021 मध्ये हाईकची सेवा पुर्णत: बंद करण्यात येईल. मात्र HikeMoji ही सेवा ग्राहकांसाठी सुरुच राहणार आहे. सुरुवातीला Hike ला लाखो जणांनी पसंती दिली होती. प्रत्येक जण दिवसातून किमान 35 मिनीट Hikeचे वापर करीत होते. मात्र कंपनीला जी अपेक्षा होती तसा प्रतिसाद ग्राहकांकडून न मिळाल्याने Hike बंद करण्यात येत आहे.’ असे मित्तल यांनी सांगितले आहे.भारतीय मॅसेजिंग अ‍ॅप्स Hike ला गुगलच्या प्ले स्टोरवरून हटवण्यात आलं आहे. भारतात व्हॉट्सअ‍ॅप्सला टक्कर देण्यासाठी 2019 मध्ये हाईक अ‍ॅप्स तयार करण्यात आलं होतं. भारती एयरटेलचे प्रमोटर सुनील भारती यांच्या मुलाने केविन भारत मित्तल यांनी Hike ची स्थापना केली होती. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ग्राहकांचा संपुर्ण डेटा आमच्याकडे सुरक्षित ठेवण्यात आला आहे. त्यांना जर तो डेटा परत हवा असेल तर ते पुन्हा डाऊनलोड करू शकता. HikeMoji चा आनंद आपण दोन नवीन अ‍ॅप्स Vibe आणि Rush सोबत घेऊ शकता.
भारतात व्हॉट्सअ‍ॅप्सला टक्कर देण्यासाठी मित्तल समुहाने मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप्स Hike तयार केले होते. त्याला भारतात 2019 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. त्यात स्टीकर अ‍ॅप्समध्ये ग्राहकांना 40 भारतीय भाषा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच 30,000 पेक्षा अधिक स्टीकरचा आनंद घेता येत होता. मात्र ग्राहकांना याला पंसती न दिल्याने Hike ला बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
जगभरात व्हॉट्सअ‍ॅप्सच्या नव्या पॉलिसीने व्हॉट्सअ‍ॅप्स बद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहे. त्यामुळे अनेक जण व्हॉट्सअ‍ॅप्सला रामराम ठोकत, सिग्नल आणि टेलिग्राम अ‍ॅप्सला प्राधान्य देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here