Home आरोग्य मुंबईकरांचा जीव धोक्यात ……

मुंबईकरांचा जीव धोक्यात ……

447
0

मुंबईची हवा अतिप्रदूषित – ‘सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च” चाअहवाल

मुंबई : मुंबईतल्या हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली आहे. तापमानात घट होत असल्याने हवेतल्या धुलिकणात वाढ झालेली दिसून येत आहे. सलग 6 दिवस मुंबईची हवा प्रदूषित झाली आहे. . वांद्रे-कुर्ला संकुलातील हवेचा दर्जा अतिशय वाईट आहे. तर भांडुप, वरळी, मालाड, अंधेरी, माझगाव, बोरीवली, चेंबूर आणि नवी मुंबईतली हवा प्रदूषित आहे.याबाबतचा अहवाल “सफर ” ने नोंदवला आहे.तापमानात घट झाल्याने धुलिकणातही वाढ झाली आहे. धुक्‍यांसह धुरके हवेत साठून हवेच्या दर्जाची पातळी खालावत आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर वाहनांच्या प्रमाण अत्यल्प असल्याने प्रदूषण कमी झाले होते. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर वाहनांची संख्या वाढली आणि त्यासोबतच प्रदूषणही वाढले.त्यामुळे मुंबईकरांचा जीव धोक्यात आला आहे.

प्रदूषित शरीरात गेल्यास फुप्फुस, हृदय, नाकपुड्या आणि संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो. शिवाय श्‍वसन, तसेच त्वचाविकार असणाऱ्या लोकांनी आणि विशेषत: लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्‍टरांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here