Home इतर चक्क आईविरोधात उभे केले वडिलांचे पॅनल…!

चक्क आईविरोधात उभे केले वडिलांचे पॅनल…!

81
0

मराठवाडा साथी न्यूज

कन्नड : वयोवृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्यामुळे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली आहे.मात्र,दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी देखील सुरु आहे.दरम्यान,हर्षवर्धन राजकारणात सक्रिय होणार असून त्यांच्या पॅनलची घोषणा करण्यात आली आहे.हर्षवर्धन जाधव यांचा मुलगा आदित्य जाधव याने मंगळवारी(२९ डिसें)कन्नड येथे पत्रकार परिषद घेऊन वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली आहे.

दरम्यान,अकरावीत असलेल्या आदित्य याने चक्क त्याची आई संजना जाधव तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या यांच्या विरोधात हर्षवर्धन यांचे पॅनल उभे केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हर्षवर्धन यांना अटक झाल्यानंतर आदित्यने स्वतः सर्व सूत्रे हातात घेतली आहेत.अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, बंद पडलेली मका खरेदी यासारख्या अनेक समस्यांचा सामना सध्या शेतकऱ्यांना करावा लागत आहे.तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे देखील यावेळी आदित्य म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here