Home मनोरंजन सनी लियोनीने दिले “सायशाला ” गिफ्ट

सनी लियोनीने दिले “सायशाला ” गिफ्ट

197
0

मुंबई : ‘सायशा, तू जो निर्णय घेतलास तो घेणे सोपे नाही. तू खूप धाडसी आहेस आणि तुला जे हवे आहे ते करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहेस. आता तू एक धाडसी, प्रेमळ आणि स्वतंत्र्य ट्रान्सवुमन आहेस. मी कायम तुझ्यासोबत आहे’ या आशायची नोट सनीने सायशाला पाठवली आहे.काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदेने सोशल मीडिया पोस्टद्वारे ट्रान्सवुमन सायशा झाल्याचा खुलासा केला. त्याच्या या निर्णयाचे बॉलिवूड अभिनेत्रीनी शुभेच्छा दिल्या. पण आता अभिनेत्री सनी लिओनीने सायशाला काही भेटवस्तू पाठवत शुभेच्छा दिल्या आहेत.सोबतच तिने एक छानसा मेसेजही लिहला आहे. सनीने सायशाला मेकअपचे सामान पाठविले आहे.

सायशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला सनी लिओनीने पाठवलेल्या भेटवस्तूंचा फोटो शेअर केला आहे.आणि सनीचे आभारही मानले आहे. तिने ट्रांसवूमेन झाल्याची माहितीही सोशल मीडियावरच दिली होती ज्यात तिने तिला सामोरे जाव्या लागणाऱ्या त्रास ,तिचा संघर्ष याबाबत तिने माहिती दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here