Home मुंबई संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, भारत जगातील पहिल्या क्रमांकावर;संरक्षण मंत्री...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, भारत जगातील पहिल्या क्रमांकावर;संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य

239
0

मुंबई : संरक्षण मंत्री राजनाथ यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल मोठं विधान केलं आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील पहिल्या स्थानवर लवकर जाईल असं भाकित त्यांनी राईझिंग इंडियाच्या वेळी बोलताना केलं.
रायझिंग इंडिया या विशेष कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर बोलताना सांगितलं.
भारताच्या अर्थव्यवस्थेत अलीकडच्या काळात बरीच सुधारणा झाली आहे. जी जगासमोर एक उदाहरण बनू शकते. ते म्हणाले की रेटिंग एजन्सीनुसार भारत 2027 मध्ये जगातील पहिल्या 3 अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट होईल.
स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होत असताना भारत जगातील सर्वोच्च अर्थव्यवस्था बनेल.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, जीएसटी आणि आयकर संकलनात झालेली वाढ काही वर्षांपूर्वीपर्यंत कल्पना न करण्यासारखी होती.आता आपली वेळ आली आहे. राजनाथ सिंह यांनी रायझिंग इंडिया समिट 2023 मध्ये सांगितले की, हा रायझिंग इंडिया आहे.भारतीय अर्थव्यवस्था खूप वेगाने वाढत आहे आणि ती जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here