Home मनोरंजन चक्क हत्तीकडून करून घेतला मसाज…!

चक्क हत्तीकडून करून घेतला मसाज…!

417
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : आपण आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या मसाज बद्दल ऐकले आहे.मात्र,एका महिलेने चक्क हत्तीकडून मसाज करून घेतल्याची आश्चरकारक घटना समोर आली असून हत्ती मसाज करत असल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.@amir2371360 ट्विटर युझरने हा व्हिडीओ पोस्ट केला असून व्हिडीओमध्ये एक महिला पोटावर झोपली आहे आणि तिच्या शेजारी हत्ती आहे जो अगदी पायापासून ते तिच्या डोक्यापर्यंत सोंडेने तिला मसाज देतो.फक्त एव्हढेच नाही तर त्यानंतर आपला एक पाय वर करून तो तिच्या पाठीवर ठेवतो आणि हलका दाब देत राहतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here