Home क्राइम मुंबई डब्बेवाला संघटनेच्या अध्यक्षांना अटक…!

मुंबई डब्बेवाला संघटनेच्या अध्यक्षांना अटक…!

41
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : सर्वत्र प्रसिद्ध मुंबईचा डब्बेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांच्यावर डब्बेवाल्यांना मोफत दुचाकी देण्याच्या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणा अंतर्गत घाटकोपर पोलिसांकडून तळेकर यांना अटक केले आली.

फेब्रुवारीमध्ये(२०२०)घाटकोपर पोलीस स्थानकात मुंबईच्या डब्बेवाल्यांनीच यासंबंधित एफआयआर दाखल केली होती. त्यावेळी तळेकर मुंबई डब्बेवाला संघटनेचे पदाधिकारी होते. तेव्हा त्यांनी दुचाकी मोफत देण्याच्या नावाखाली डब्बेवाल्यांची काही कागदपत्र घेतली होती.पण, त्यानंतर डब्बेवाल्यांना दुचाकी
विक्रेत्या कंपन्यांकडून फोन येऊ लागले.कारण,डब्बेवाल्यांच्या नावाने हे कर्ज काढण्यात आले होते.त्यामुळेच त्यांना कर्जाचे हप्तेही भरावे लागले.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डब्बेवाल्यांनी मिळून तळेकर सोबत जणांविरोधात कलम ४२० अन्वये एफआयर करत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान,घाटकोपर पोलिस स्थानकाकडून काही महिन्यांपासून यासंबंधीचा तपास सुरु होता.त्यानंतर तळेकर यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. यानंतर आता तळेकरांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here