Home मुंबई ऐन लग्नसराईत सोने झाले स्वस्त…!

ऐन लग्नसराईत सोने झाले स्वस्त…!

54
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : सोन्याचे दर पुन्हा एकदा 50 हराजारांपेक्षा कमी आकड्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. MCX वर बुधवारी सोन्याचे दर 48513 वर बंद झाले होते. गुरुवारी या दरांमध्ये 200 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात सोन्याचे दर 4 टक्क्यांनी स्वस्त झाले. त्यातच आता हे दर 8000 रुपयांनीही उतरु शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

22 कॅरेटचा रेट 44705

Gold खरेदीसाठी फायद्याचा दिवस; सोने सहा महिन्यांतील सर्वात कमी दरांवर
ibja.comच्या वृत्तानुसार दिल्लीत सोन्याचे दर प्रति 10 ग्राम (22 कॅरेट) दर 44705 रुपयांवर पोहोचले. गुरुवारी हे दर कमी झाल्याचा आकडा निरीक्षणात येतानाच बंगळूरु- 46200 रुपये, कोलकाता- 50700, मुंबई- 49800 आणि चेन्नई- 46400 अशा किमतीने सोन्याचे दर उतरल्याचे पाहायला मिळाले.
चांदीच्या दरात तेजी

Gold खरेदीसाठी फायद्याचा दिवस; सोने सहा महिन्यांतील सर्वात कमी दरांवर

चांदीच्या दरांमध्ये मात्र तेजी पाहायला मिळाली. गुरुवारी एक किलो चांदीचे दर 60050 रुपयांवर पोहोचले. या दरांमध्ये जवळपास 550 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळाले

सहा महिन्यात दर घटले

Gold खरेदीसाठी फायद्याचा दिवस; सोने सहा महिन्यांतील सर्वात कमी दरांवर कोरोना व्हायरसवरील लसीच्या विविध बातम्यांचे थेट परिणाम हे सोनं- चांदीच्या दरावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवाती काळात लसीमध्ये यश मिळत असल्यामुळे सोन्याकडे काहीसा ओघ कमी आहे आणि ग्लोबल इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूकही वाढली आहे.
नोव्हेंबरमध्ये दर सर्वात कमी

Gold खरेदीसाठी फायद्याचा दिवस; सोने सहा महिन्यांतील सर्वात कमी दरांवर

अमेरिकेतील राजकीय अस्थिरताही संपली आहे. ग्लोबल ग्रोथमध्ये रिकव्हरीच्या आशा वाढल्यामुळे सोन्याच्या दरांवरील भार वाढला आहे. मागील 6 महिन्यांचा आढावा घेतल्यास नोव्हेंबर महिन्यात सोन्याचे दर सर्वाधिक कमी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here