Home क्राइम 3 किलोपेक्षा जास्त सोने बुटांच्या तळव्यामध्ये

3 किलोपेक्षा जास्त सोने बुटांच्या तळव्यामध्ये

264
0

तुम्ही चोरी करण्याचा अनेक पद्धती बघितल्या असतील पण ही घटना खूपच वेगळी आहे.सोने, दागिने किंवा ड्रग्स लपवण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. अनेकदा असे अनेक जण विमानतळावरही पकडले जातात. अशीच एका घटनेत मुंबई विमानतळावर तीन नागरिकांना पकडण्यात आले आहे. या लोकांकडून १.४० कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परदेशी नागरिकांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

परदेशी नागरिक आदिस अबाबाहून मुंबईत आले होते. या लोकांनी अंडरवेअर आणि बुटांच्या तळव्यामध्ये सोने लपवले होते. एकूण सोने ३ किलोपेक्षा जास्त होते आणि त्याची किंमत अंदाजे १.४० कोटी रुपये आहे.
कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या लोकांना तस्करीच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे. अशाप्रकारे सोने लपवण्याचे कारण काय, याची माहिती या लोकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.अलीकडेच, देशातील विविध विमानतळांवर सीमाशुल्क विभागाने अनेकांना अमली पदार्थ आणि सोन्या-चांदीच्या वस्तूंसह अटक केली आहे ज्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न केला जात होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here