Home आरोग्य पंकजा मुंडे ‘आयसोलेट’…!

पंकजा मुंडे ‘आयसोलेट’…!

302
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून आपली तब्येत ठीक नसल्याचे सांगितले आहे. ‘सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जबाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे’ असं पंकजा यांनी सांगितले आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता पंकजा मुंडे यांनी खबरदारी म्हणून आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला आहे.तसंच, पंकजा यांनी पदवीधर निवडणुकीच्या मतदानासाठी औरंगाबादच्या मतदारांना मतदान करण्याचे आवाहनही केले आहे.

तसेच आज शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान होत आहे. पंकजा मुंडे यांची औरंगाबाद पदवीधर निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे पंकजा यांनी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंदीचे मत देऊन विजयी करावे’ असं आवाहन केले आहे.दरम्यान, ‘अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी’ असं सूचक विधानही पंकजा यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here