Home महाराष्ट्र बनावट दस्ताऐवजाद्वारे कोट्यावधीच्या जमिनी भूमाफियांनी हडपल्या ; जि.प.सदस्यांचा आरोप

बनावट दस्ताऐवजाद्वारे कोट्यावधीच्या जमिनी भूमाफियांनी हडपल्या ; जि.प.सदस्यांचा आरोप

12245
0

मराठवाडा साथी न्यूज/औरंगाबाद
जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या कोट्यवधींच्या मालमत्ता असून त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे, शहरातील जि. प.च्या मालकीच्या अनेक कोट्यावधीच्या जमिनी बनावट दस्तऐवज बनवून भूमाफियांनी गिळंकृत केल्या आहे. पॅनलवरचे वकील मॅनेज होत असल्याने जिल्हा परिषदेला भुर्दंड सहन करावा लागत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया जिल्हा परिषद स्थायी समिती सर्वसाधारण सभेत उमटल्यानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली ‘अतिक्रमण बचाव समिती’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Billions of lands seized by land mafia through forged documents; Allegation of ZP members)

जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद स्थायी समिती सर्वसाधारण सभा शुक्रवार (२०) रोजी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपाध्यक्ष एल जि गायकवाड, आरोग्य सभापती अविनाश गलांडे, बांधकाम सभापती किशोर बलांडे, जि.प. सदस्य केशवराव तायडे, रमेश गायकवाड, मधुकर वालतुरे, पंकज ठोबरे, जितेंद्र जैस्वाल, किशोर पवार, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे आदींसह सर्व विभागाचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या कोट्यवधीच्या मूळ जमिनी बनावट दस्तऐवज तयार करून शहरातील भूमाफियाणी गिळंकृत केल्या आहे. अनेक जमिनीचे प्रकरण कोर्टात सुरु असून पॅनल वरील वकील मॅनेज होतात असा आरोप जि.प. सदस्य रमेश गायकवाड यांनी केला, तर जिल्हा परिषदने वकिलावर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती गठीत करण्याची मागणी देखील यावेळी त्यांनी केली. यालाच अनुसरून केशवराव तायडे म्हनाले कि, पॅनल वरचे वकीलामुळे किती भुर्दंड भरावा लागत आहे, याबाबत अनेक वेळा माहिती मागून सुद्धा माहिती देण्यात आली नाही. जिपच्या कोट्यवधीच्या जागा हडप होत असेल तर आपला काय उपयोग असा प्रश्न तायडे यांनी सभागृहापुढे उपस्थित केला. जागेच्या अतिक्रमणाच्या बाबतीत उत्तर देताना बांधकाम सभापती किशोर बलांडे म्हणाले की, अतिक्रमण बाबत बांधकाम विभागाचा सर्व अहवाल तयार आहे, परंतु अनेक वेळा मागणी करूनसुद्धा बैठक लावण्यात आली नाही. तळमळ असेल तर बैठक घेऊन निर्णय घेऊ. यासाठी अध्यक्ष व प्रशासनाने बैठकीची तारीख ठरवावी, उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी. प्रॉपर्टीच्या बाबतीत आपल्याला ही आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पस्ट केले.

उपाध्यक्ष ‘अतिक्रमण बचाव समिती’चे अध्यक्ष  
दिवसेंदिवस वाढत्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल जी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अतिक्रमण बचाव समिती स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत सदस्य रमेश गायकवाड, मधुकर वालतुरे, किशोर बलांडे, अविनाश गलांडे, केशवराव तायडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांच्यासह महसूल प्रशासनाचा निवृत्त अधिकारी, भूमी अभिलेखचा निवृत्त अधिकारी आदींचा या समितीमध्ये समावेश करण्यात येणार आहे. समितीला लागणाऱ्या खर्चाची तरतूद देखील जि.प. तर्फे करण्यात येणार आहे.    

फायली गायब कशा होतात ? उपाध्यक्ष गायकवाड
शहरातील जिल्हापरिषदेच्या कोट्यवधींच्या जमिनी आहेत. त्यावर अतिक्रमण होत आहे. अतिक्रमण हे एका दिवसात होत नाही. आपले कंपाउंड तोडले आहे. भिंती कोरल्या. इतक्या दिवस अधिकारी पदाधिकारी झोपले आहेत का ? आपल्या जमिनीच्या कागदपत्रांच्या फायली गायब होतातच कशा ? असा संतप्त सवाल उपाध्यक्ष एल जी गायकवाड यांनी उपस्थित केला.

स्वतःचे काम म्हणून लक्ष देण्याची गरज – सभापती गलांडे
यावेळी बोलताना गलांडे म्हनाले कि, प्रत्येक सभेत यावर चर्चा होते, सर्व पोटतिडकीने बोलतात मात्रबैठकीनंतर सर्व विसरून जातात. यासाठी व्यक्तिगत पुढाकार घेऊन लक्ष द्यावे लागेल तरच मालमत्ता वाचेल. पैठण रोडवर कृषी विद्यापीठाच्या जागेला लागूनच 42 एकर जागा आहे. त्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेच्या जागेसाठी विनोद पाटील आणि सभापती गलांडे यांनी व्यक्तिगत कोर्टात दाखल केलेल्या प्रकरणाची माहिती देखील सभागृहाला दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here