Home राजकीय जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचाय हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय आहे;राज...

जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचाय हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय आहे;राज ठाकरेंची महिलासांठी खास पोस्ट

214
0

जागतिक महिला दिन हा दिवस जागतिक स्तरावर दरवर्षी 8 मार्चला महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी साजरा केला जातो.तसंच, लिंग समानतेचं महत्व पटवून देण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो. आज जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. फेसबुक पोस्टव्दारे त्यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या. राज ठाकरे म्हणाले, ‘सगळ्या चौकटी मोडून आज सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरु आहे, ती थक्क करणारी आहे. आज ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील, इथल्या मुलींना उच्च शिक्षणाची, स्वतःच करिअर घडवायची प्रचंड ओढ आहे. आणि त्यासाठी त्या घरापासून लांब इतर शहरांत किंवा परदेशांत नोकरी, शिक्षणाच्या निमित्तानं सहज स्थिरावत आहेत. जिथं जातील तिथं स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे.’शंभर ,दीडशे वर्षांपूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून प्रचंड संघर्ष करावा लागत होता, अशी परिस्थिती होती. आणि त्याच समाजात मोठमोठ्या उद्योगसमूहांच्या व्यवस्थापनापासून ते जागतिक अर्थकारणात उलाढाली करणाऱ्या संस्थांमध्ये मोठ्या पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत. इतकंच काय देशाची अर्थव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, सीमांचं संरक्षण ते थेट राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. आणि हे सर्व त्यांनी निव्वळ स्वकर्तृत्वावर कमावलं आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.ते पुढं म्हणाले, म्हणूनच स्त्रियांनी आता राजकारणात देखील मोठ्या प्रमाणावर यायला हवं. ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं’ हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय आहे आणि हे साध्य करायचं असेल तर स्त्रियांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे, ह्याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच, विविध क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे, असं सांगत राज ठाकरेंनी महिलाना राजकारणात येण्याची ऑफर दिली आहे. शेवटी त्यांनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.महाराष्ट्र घडवणं’ हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here