Home क्रीडा IPL २०२३ चे ५ नवीन नियम बनवले

IPL २०२३ चे ५ नवीन नियम बनवले

284
0

2023 च्या आयपीएलमध्ये अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळतील . नवीन हंगामापूर्वी बीसीसीआयने अनेक मोठे बदल केले आहे. सीझनमध्ये ५ नवीन नियम खेळाची रंगात अधिक वाढवण आहेत.

नियम पहिला – इम्पॅक्ट प्लेयरIPL २०२३ पूर्वी सर्वात जास्त चर्चेत असलेला नियम म्हणजे इम्पॅक्ट प्लेअर नियम. यामध्ये कोणताही संघ त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळाडू बदलू शकतो. पण जर संघाने एखाद्या परदेशी खेळाडूची इम्पॅक्ट प्लेअर म्हणून निवड केली तर त्यांना दुसऱ्या परदेशी खेळाडूला वगळावे लागेल. पूर्वीप्रमाणे एका वेळी ४ पेक्षा जास्त परदेशी खेळाडू मैदानावर खेळू शकत नाहीत.प्रत्येक डावात १४व्या षटकापूर्वी इम्पॅक्ट प्लेयर सामील करता येईल. यासाठी नवा इशाराही देण्यात येणार आहे. इम्पॅक्ट प्लेयरने सामन्यात प्रवेश केला आहे हे दर्शविण्यासाठी अंपायर आपले हात वर करत क्रॉसचं साईन दाखवेल. इम्पॅक्ट प्लेयरच्या जागी मैदानाबाहेर पाठवलेला खेळाडू पुन्हा सामन्यात भाग घेऊ शकणार नाही. नाणेफेकीच्या वेळी, संघांना चार इम्पॅक्ट प्लेयरची नावे द्यावी लागतील. आणि याच ४खेळाडूंना सामन्यांमध्ये खेळता येणार आहे .

नियम दुसरा – नाणेफेकीनंतर प्लेइंग इलेव्हनची घोषणाआतापर्यंत कर्णधारांना नाणेफेकीपूर्वी प्लेइंग इलेव्हन सांगत होते . मात्र यंदाच्या मोसमात असे होणार नाही. नाणेफेक झाल्यानंतर कर्णधार प्लेइंग इलेव्हनला सांगेल. कर्णधार २ वेगवेगळ्या टीम शीटसह नाणेफेकीसाठी येऊ शकतो. नाणेफेकीच्या निकालानुसार तो त्याची प्लेइंग इलेव्हन देऊ शकत

नियम तिसरा – वाइड आणि नो-बॉलसाठी DRSमहिला प्रीमियर लीगमध्ये संघ वाइड आणि नो-बॉलसाठी डीआरएस घेत होते. आता आयपीएलमध्येही हेच होणार आहे. वाइड किंवा नो-बॉलसाठी डीआरएस घेतला जाऊ शकतो.

नियम चौथा – अयोग्य हालचालीवर डेड बॉल यष्टिरक्षक किंवा मैदानावर उपस्थित असलेल्या कोणत्याही क्षेत्ररक्षकाने गोलंदाजीदरम्यान चुकीची हालचाल केली, तर पंच तो चेंडू डेड बॉल म्हणून घोषित करतील. यासोबतच फलंदाजी करणाऱ्या संघाला ५ धावाही दंड म्हणून देण्यात येणार आहेत.

नियम पाचवा – स्लो ओव्हर रेटसाठी सामन्यातच शिक्षा आयपीएलमधील स्लोओव्हर रेटची बरीच चर्चा मात्र यावेळी असे झाल्यास सामन्यातच शिक्षा भोगावे लागणार आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० प्रमाणे, कटऑफ वेळेनंतर टाकल्या जाणाऱ्या सर्व षटकांदरम्यान फक्त ४ खेळाडू सीमारेषेवर राहतील. पॉवरप्लेनंतर सामान्य स्थितीत ५ क्षेत्ररक्षक सीमारेषेवर राहू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here