Home देश-विदेश महात्मा गांधींच्या पणतूचे कोरोनामुळे निधन

महात्मा गांधींच्या पणतूचे कोरोनामुळे निधन

423
0

मराठवाडा साथी न्यूज

केपटाउन : कोरोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास असणारे महात्मा गांधी यांचे पणतू सतिश धुपेलिया यांचे कोरोनाच्या आजाराने निधन झाले.अवघ्या तीन दिवसांपूर्वीच त्यांनी आपला ६६ वा वाढदिवस साजरा केला होता. रुग्णालयात न्युमोनियावर उपचार सुरू असताना त्यांना कोरोनाची बाधा झाली होती, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.धुपेलिया यांची बहीण उमा धुपेलिया-मेस्थरी यांनी सोशल मीडियावर ही बातमी दिली.

महात्मा गांधी यांचे पणतू सतिश धुपेलिया हे मीडियात कार्यरत होते. व्हिडिओग्राफर आणि फोटोग्राफर म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले. दरबनजवळील गांधी विकास ट्रस्टच्या कामकाजात ते सक्रिय होते. त्याशिवाय आपल्या सेवाभावी वृत्तीमुळे ते दक्षिण आफ्रिकेतील सर्वच समाजघटकात लोकप्रिय होते. याशिवाय धुलेपिया अनेक सामाजिक संघटनांमध्येही सक्रिय होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here